शेतकऱ्यांच्या आत्महत्याः डुर्खाइमच्या तत्त्वांनुसार विश्लेषण
जमिनीवरील वास्तवः मराठेशाहीच्या व नंतरच्या (१८०३-१८५३) निजामशाही काळात अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये श्रमविभाजनाची आणि श्रममूल्याची बलुतेदारी पद्धत होती. ब्रिटिश राजवटीत जमिनींचे मालकी हक्क शेतकऱ्यांना देण्याची रयतवारी पद्धत अंमलात आली. सुरुवातीला करभार कमी होता, पण नंतर तो मोठ्या प्रमाणात वाढवला गेला. वसुलीसाठी मोठी नोकरशाही उभारली गेली. या पद्धतीत उच्चवर्णीय (ब्राह्मण, राजपूत) जातींनी मालकी हक्क प्रस्थापित केले. …